महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये लग्न म्हटलं तर उखाणे हे आलेच त्याशिवाय मज्जाच नाही चला तर मग आपण marathi ukhane for male/husband/groom म्हणजेच पुरुषांसाठीचे उखाणे त्यांच्या पत्नीसाठी आपण पाहणार आहोत.
Top Ukhane in Marathi For Male ( पुरुषांसाठी मस्त मराठी उखाणे )
friendship day quotes in marathi
- 1) काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली…. माझ्या मनात.
- 2) रूप्याचा लोटा सोन्याची झारी, असली काळीसावळी तर… माझी प्यारी.
- 3) हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी… नाजुक जसे गुलाबाचे फुल.
- 4) सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करू सुखाचा… सु, मी आणि एक मुल.
- 5) जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी… म्हणजे लाखात सुंदर नार.
- 6) अस्सल सोने चोविसकरेट .. अन् माझे झाले आज मॅरेज.
- 7) तुला आणला मोगऱ्याचा गजरा लग्नाचा वाढदिवस करू साजरा,
- 8) कोरा कागज काळी शाई, … लारोज देवळात जाण्याची घाई.
- 9) संसार रूपी सागरात पती पत्नीची नौका, ….चे नाव घेतो सर्व जण ऐका.
- 10) दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी… व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
- 11) आंबागोड, उस गोड, त्याही पेक्षा अमृत गोड, . .. नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
- 12) श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, .. गेली माहेरी की होतात माझे हाल,
- 13) …माझे पिता…माझी माता, शुभमुहूर्तावर घरी आणली.. ही कान्ता.
- 14) जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुंगध, …च्या सहवासात झालो मी धुंद.
- 15) उभा होतो मळ्यात, नजर गेली खळयात, नवलांचा हार…च्या गळ्यात,
Modern Marathi Ukhane For Male ( नवीन उखाणे फक्त पुरुषांसाठी)
- 16) तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल … चंनाव घेतो तुमच्या करीता स्पेशल,
- 17) प्रसन्न वदनाने आले रविराज, ….ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
- 18) नाशिकची द्राक्षे नागपुरची संत्री, …. आज पासुन माझी गृहमंत्री,
- 19) सीतेसारखे चारीप्रय, रंभेसारखे रूप, …मिळाली आहेमला अनुरूप,
- 20) निर्सगवार करू पहात आहे आजचा मानव मात, अर्यागिनी म्हणुन…ने दिला माझ्या हातात हात.
- 21) सांयकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग … माझी नेहमी घरकामात दंग.
- 22) मायामय नगरी, प्रेममय संसार,, …च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार,
- 23)राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास.
- 24)जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
- 25)रूकमीणीने केला पण कृष्णाला वरीन, …च्या साथीने आदर्श संसार करीन.
- 26)जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला…प्रेमपुतळी,
- 27) जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर… सारथी.
- 28) हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, …च्या जीवनात मला आहे गोडी.
- 29) चंद्रला पाहून भरती येते सागराला, …ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
- 30)निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,… चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान.
- 31) चंद्राचा होता उद्य समुद्रात येते भरती, …दर्शनाने/स्पर्शाने सारे श्रम हरती.
- 32) जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुच बांधतो प्रेमाने.
- 33) वेरूळची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, …आहे माझी सर्वा पेक्षा.
- 34) पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाड़ पेढे, …चे नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे
- 35) उगवला सुर्य मावळलीरजनी, … .चे नाव सदैव माझ्या मनी.
- 36) कृष्णाच्या वासरीचाराचेला लागला घ्यास, …देतो मी लाडवाचा घास.
- 37) सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, …चे नाव घेतो… व्या घरात.
- 38) श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
- 39) मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, … बरोबर बांधली जीवन गाठ.
Marathi Ukhane For Groom/male ( नवरदेवासाठी मराठी उखाणे )
- 40) मोहनाही माया नाही, नाही मत्सर हेवा, …चे नाव घेतो निट लक्ष ठेवा.
- 41) आई-वडील, भाऊबहिणी, जणू गोकूळासारखे घर, .. च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
- 42) चांदीच्या ताटात, रूपया वाजतो खणखण, …चे नाव घेऊन सोडतो आता कंकण.
- 43) पुढे जाते वासरू, मागुन चालली गाय, …. ला आवडते नेहमी द्धावरची साय.
- 44) संसाराच्या सागरात पती पत्नी नावाडी, …मुळे लागली मला संसाराची गोडी.
- 45) देवाजवळ करतो मी दत्ताची आरती, …माझ्या जीवनाची सारथी.
- 46) स्वतंत्र भारताची तिरंगी ध्वजाणे वाढविली शान, …. चे नाव घेतो ठेऊन सर्वाचा मान,
- 47) काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, … सोबत जीवनात मला आहे आनंद.
- 48) नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,…आहे माझे जीवन-सर्वस्व.
- 49) भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, …. चे नाव घेतो जरा पहा मागे वळून,
- 50) बहरली फुलांनी निशीगंधाची पाती, …. चे नाव घेतो लग्नाच्या राती.
- 51) ताजमहाल बंधायला कारागीर होते कुशल, …चे नाव घेतो लग्नाच्या रात्री.
- 52) आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान, …. चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान,
- 53) देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
- 54) अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा, ….ला घास घालतो वरण-भात-तुपाचा.
- 55) देशभक्तांच्या त्यागामुळे स्वराज्य हाती आले, … शी लग्न करून मनोरथ पुर्ण झाले.
- 56) श्रावण महीन्यात प्रत्येक वारी सण, … ला सुखात ठेवीन हा माझी पण,
- 57) टाळ चिपळयांचा गजर त्यामधे वाजे विणा, …चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
- 58) निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी,… चे नावं घेतो…. च्या घरी,
- 59) पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, …च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.
- 60) नंदनवनीच्या कोकिळा, बोलती गोड …. राणी माझा तळहाताचा फोड.
- 61) नंदनवनात अमृताचे कलश, …..आहे माझी खुप सालस.
- 62) देवाला भक्त करतो मनोभारे वंदन … मुळे झाले संसाराने नंदन.
- 63) भाजीत भाजी मेथीची, ….माझी प्रितीची.
- 64) दही चक्का तुप, ….आवडते मला खुप.
- 65) हिरळीवर चरती सुवर्ण हरिणी, … झाली आता माझी सहचारिणी.
Marathi Ukhane For Male Funny (पुरुषांसाठी मजेदार मराठी उखाणे )
- 66) आंथरली सतरंजी त्यावर पांघरली शाल, रावांच्या जीवनात… राहील खुशाल.
- 67) आंब्याच्या झाडावर बसुन कोकीळा करी कुजन, माझ्या नावाचे… करी पुजन,
- 68) श्रीकृष्णाने केला पण रुक्मीणीलाच वरीन, … च्या सोबत आदर्श संसार करीन,
- 69) चाकणच्या किल्ल्यावर ठेवल्या फौजा, रावाच्या जीवावर… मारते मौजा.
- 70) सोन्याची संपली,मोत्यांनी गुंफली, .राणी माझी घरकामाता गुंतली.
- 71) रुप्याचे ताट त्यावर सोन्याचे ठसे, …ला पाहून चंद्र-सुर्य हसे.
- 72) पाण्याने भरला कलश त्यावर आंब्याची पाने फुले, …..चं नाव घेतल्या वर चेहरा माझा खुले.
- 73) हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात,….च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
- 74) मातीच्या चुली दालनात गरोदर,.. झालीस माझी आता चल बरोबर.
- 75) शंकरासारखा पिता अनुपार्थती सारखी माता, ….राणी मिळाली स्वर्ग आला हाता.
- 76) नभांगणी दिसे शरदाचे चांदणे …चे रुप आहे अत्यंत देखणे.
- 77)गंगेची वाळूचाळणीने चाळू, चलचल…आपन सारीपाट खेळू
- 78) इंग्लीश भाषेला महत्व आले फार, …. ने माझ्या संसाराला लावला हातभार.
- 79) सर्वऋतुत ऋतु आहे वसंत, …… केली मी पत्नी म्हणून पसंत.
- 80) सुर्याने दिली साडी चोळी आणि गोफ, …..रावाच्या मांडीवर… घेते झोप.
- 81) इंद्राची इंद्राणी, दुष्यंताची शकुंतला, …नाव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
- 82) रखरखत्या वेशाखात प्रेमाचा धुंद वारा, जीवनाचा खेल समजला…. मुळे सारा.
- 83) वरमथळा खाली बातमी, वर्तमान पत्री रीती, ….. चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती.
- 84)मुखी असावे प्रेम हातामध्ये दया, …सोबत जडली माझी माया.
- 85) लाखात दिसते देखणी, चेहरा सदा हसरा, ….च्या रुपापुढे, अप्सरेचा काय तोरा.
- 86) आंबेवनात कोकीळा गाते गोड, … आहे माझी तळहाताचा फोड.
- 87) गुलाबाचे फुल गणपतीला वाहीले, च्या साठी…. गाव पाहीले.
- 88) हिरयाचा कंठा मोत्याचा घाट, ….च्या हौशीसाठी केला सगळ थाट.
- 89) रसाळ पाहीजे वाणी स्त्री पाहीजे निर्मला, … च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.
Long Marathi Ukhane For Male (थोडे मोठे मराठी उखाणे पुरुषांसाठी)
- 90) श्रीमंत माणसांना असते पैशाची धुंदी, …चे नाव घेण्याची ही पहीलीच संधी
- 91) खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड, ……च्या रूपात नाही कुठेच खोड.
- 92) कळी हसेलफुल उमलेल, मोहरुन येईल सुगंध,….,.च्या सोबतीत,गवसेल जीवनाचा आनंद,
- 93) पूर्ण तिथे काय उणं म्हणतात सारी जण,……न केलं सार्थ माझं जिणं.
- 94) कपाळा पचे कुंकु जशी चंद्राची कोर, … .च्या मदतीवर माझा सगळा जोर,
- 95) चित्रकाराने केली फलकावर रंगाची उघळण, …. चे नाव भासे जणु माणिक मोत्यांची उधळण.
- 96) निसर्गाला नाही आदी नाहीं अंत, …..आहे माझ्या मनपसंत.
- 97) चौकोनी आरशाला वाटोळी फ्रेम, माझ्या लाडक्या… वर माझे खरे प्रेम.
- 98) चंद्र आहेचांदणीचा सांगाती, …. आहे माझी जीवन साधी.
- 99) विज्ञान युगात माणुस करतोय निसर्गावर मात, …..चा अर्धांगीनी म्हणून घेतला मी माझ्या हातात हात.
- 100) अंगणात होती तुळस, तुळशीला घालत होती….. पाणी, आधी होती आई बापाची तान्ही आता आहे… ची राणी.
- 101) त्यांचे लुक लुका चंद्राला आवडलं, ….मी जीवनसाथी म्हणुन निवडलं.
आशा करत आहोत कि वरील marathi ukhane for male/husband/groom उखाणे तुम्हाला खूप आवडले असतील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा ukhane in marathi for male कसे वाटले, आम्ही पुन्हा नवीन उखाणे घेऊन येत राहू आवडल्यास नक्की सगळ्यांसोबत शेअर करा धन्यवाद.