40 Rukhwat Ukhane In Marathi रुखवतीचे उखाणे

rukhwat ukhane in marathi रुखवत चे उखाणे हे महाराष्ट्र मध्ये घेतले जातात. हि एक पारंपारिक पध्दत आहे यामध्ये जेव्हा एखादी मुलगी लग्न करून तिच्या सासरी जात असते तेव्हा तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी काही चविस्ट पदार्थ बनविलेले असतात ते ती आपल्या सासरी घेऊन जाते. याचा अर्थ असा कि नवरी मुलगी आपली स्वयंपाक कला सासरवाडीला दाखवते. यामध्ये फराळ गोडधोड पदार्थ यांचा समावेश असतो. हि परंपरा जास्तीत जास्त फक्त महाराष्ट्र राज्यात पहायला मिळते.(rukhwat che ukhane)

rukhwat-ukhane-in-marathi
rukhwat ukhane in marathi/rukhwat faral ukhane in marathi

rukhwat faral ukhane in Marathi रुखवत फराळ उखाणे मराठीमध्ये

लग्नामध्ये निरनिराळे फराळ बनवून सुंदर असे सजवून एका टेबल वर किंवा बिछान्यावर ठेवले जातात त्यावेळी हे उखाणे घेतले जातात.

  • नंदू बाई या ________या आत आहेत शेवया

 

  • सर्वांना केला नमस्कार वाकून बेसन चे लाडू म्हणतात बघता का चाखून

 

  • लग्नात भारी होता, तुमच्या बॅण्ड बाजा, मी तर आहे, खुसखुशीत खाजा.

 

  • भारतीय क्रिकेट कॅप्टन विराटने मारला सिक्स आनंदाने खावा कुरकुरीत चिप्स

 

  • अनुभवाची फुले गोळा करते वाकून चिरोटे म्हणतात बघता का चाखून?

 

  • फळ कापायला, द्या सूरी, मी तर आहे, गोड गोड पुरी.

 

  • लग्नाच्या मांडवाला रेशमी कापड आत आहेत कुरकुरीत पापड

 

  • लग्न प्रसंगी फुटतात हास्याचे पेव आत आहे खमंग शेव

 

  • पाटलाच्या शेतात पेरला घेवडा आत आहे खुसखुशीत चिवडा

 

  • आमच्या शेतात, पेरला घेवडा, आत आहे, खुसखुशीत चिवडा.

 

  • देशात देश हिंदुस्थान सरसा आत आहेत गोड अनारसा

 

  • तूप वाढायला घेतला चमचा चांदीचा घमघमाट सुटला बुंदी लाडू चा

 

  • जावईबापू घ्या जरा सबुरी आता हे फुगलेली संजोरी

 

  • आईने मुलीला दिले मुलायम कापड आत आहेत कुरकूरीत पापड

 

  • जावई बापू, नका लाजू, आत आहे, गोड काजू.

 

  • हिरव्यागार रानात पिकलेली काकडी खाऊन पहा खमंग पापडी

 

  • पिशवी पिशवी आहे कापडी मी तर आहे सालपापडी

 

  • मोर आहे पक्षांचा राजा मी तर आहे खुसखुशीत खाजा

 

rukhwat ukhane in Marathi मराठी रुखवत उखाणे

  • अनुभवाची फुले, गोळा करते खाली वाकून, चिरोटे म्हणतात, बघता का चाखून??

 

  • घनदाट जंगल तिकडून आला लांडगा मी तर आहे तिखट सांडगा

 

  • सौभाग्याचे लेणे आहे हिरवं कापड आत आहे तांदळाचे पापड

 

  • पैठणी साडीला सोन्याची जरी मी तर आहे गोड गोड पुरी

 

  • सोन्याच्या दरात कधी असते तेजी तर कधी असते मंदी मी तर आहे खारी बुंदी

 

  • दोन्ही परिवारांनी मिळून, लग्न केले फिक्स, सर्वांनी चाखून बघा, कुरकुरीत चिप्स.

 

  • गोड गोड सारणाने टुम्म मी फुगले या करंजीला पाहून जावईबापू हसले

 

  • लग्नाचे जेवण खाऊन डोळ्यांवर आली झापड यात आहेत उडदाचे पापड

 

  • नवरदेवाच्या भावांचा रुबाब/उत्साह दांडगा आत आहे कुरकुरीत सांडगा

 

  • साडीत साडी, पेशवाई, मी तर आहे, बालुशाई.

 

  • पहा जावईबापू माझ्याकडे पाहतात कसे मी आहे गोड गोड अनारसे

 

  • वराकडची मंडळी आली वधूला न्यावया यात आहेत सुंदर सुंदर कुरडया

 

  • लग्नघरी दारात रांगोळी काढू मी आहे बेसनाचा लाडू

 

  • नव्या वधूच्या पावलांनी, घरात पडले ठसे, मी आहे आत, अनारसे.

 

  • आई बाबांचे संस्कार जन्मभराची ठेव मी तर आहे खुसखुशीत शेव

 

  • लग्नाच्या ताटात गोड पदार्थ वाढू मी आहे बुंदीचा लाडू

 

  • सासरची मंडळी आली रुखवत पहावया आत आहेत नाजूक नाजूक शेवया

 

  • जावईबापूंचा थाट बघा बघा केवढा यात आहे पोह्यांचा चिवडा

 

  • नवरी मुलीने लावली सोन्याची टिकली मी तर आहे कुरकुरीत चकली

 

  • ननंदबाई देवपूजेसाठी, लागतो गडू, मी आहे मनमोहक, बुंदीचा लाडू.

 

  • आले आले वर-वधू अक्षता वाटा आत आहे गोड गोड चिरोटा

 

  • सुंदर सासूबाई रूबाबदार मामंजी आत आहे खुसखुशीत करंजी

 

आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे रुखवतीचे मराठी उखाणे / rukhwat che ukhane हे नक्की आवडले असतील. जर तुम्हाला हे आवडले असतील तर तुम्ही हे marathi ukhane for rukhwat / rukhwat ukhane in marathi / rukhwat ukhane in Marathi for female आपल्या मित्राबरोबर पण Share करू शकता. कदाचित त्याला पण अश्याच मराठी उखाण्याची गरज असू शकते.

Leave a Comment

x
error: Content is protected !!