73 Makar Sankranti Ukhane मकर संक्रांतीचे उखाणे

makar sankranti ukhane उखाणे घेणे हि परंपरा आपल्या महाराष्ट्र भूमी मध्ये पूर्वीपासून चालत आली आहे, मग ते उखाणे लग्नाचे असो वा सनादिवशीचे या शिवाय मज्जाच नाही येत. या लेखात आपण sankranti che ukhane पाहणार आहोत हे उखाणे महिला आपल्या पतींसाठी घेतात संक्रांत हा सन भारतामध्ये फार मोठा मानला जातो, या सणादिवशी तिळगुळ वाटून शुभेच्छा दिल्या जातात.

makar-sankranti-ukhane
makar sankranti ukhane/sankranti che ukhane/marathi ukhane sankranti

संक्रातीचे उखाणे(sankranti che ukhane)(makar sankranti ukhane)

  • नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा आणि …..चा जोडा राहो साता जन्माचा.

 

  • तिळगुळ घ्या आली संक्रांत_____शी झाले लग्न स्वभावाने फारच शांत

 

  • गुलाबाचे फूल लावते वेणीला ___ रावांची आठवण येत प्रत्येक क्षणाला.

 

  • नवीन वर्ष सण पहिला मकरसंक्रातीचा मान हळदीकुंकूवाचा मान सुवासिनींचा..आणि …’चा जोडा राहो साताजन्माचा.

 

  • संसारुपी सागरात पली असावे हौशी ……राव च नाव घेते मकर संक्रांती दिवशी.

 

  • गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी,…..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या वेळी.

 

  • हिऱ्याची अंगठी, चांदीचे पैंजण ___ रावांचे नाव घेत आहे ऐका गुपचूप सर्वजण

 

  • तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत, …रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित

 

  • निसर्ग निर्मिती च्या वेळी सुर्यनारायण झाले माळी ……चे नाव घेते संक्रांतीच्या वेळी.

 

  • कोल्हापूरचा चिवडा,लोणावळ्याची चिक्की,……रावासमोर सर्व दुनिया फिकी.

 

  • पित्याचे कर्तव्य संपले, झाली माझ्या कर्तव्याला सुरुवात ___ रावांची सोबत लाभो माझ्या भावी जीवनात.

 

  • सोन्याचे मंगळसूत्र सोनारांनी घडवले,…..रावांच्या नावासाठी मैत्रिणींनी अडविले.

 

  • तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत, ……रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित.

 

  • तिळगुळ घ्या आली संक्रांत_______ शी झाले लग्न महाराष्ट्र माझा प्रांत

 

  • मंगळसुत्रात शोभून दिसतात काळे मनी ___ राव माझ्या सौभाग्याचे धनी.

 

 

संक्रांती उखाणे (sankranti ukhane)(makar sankranti ukhane)

  • देवीच्या मंदिराला सोन्याच्या कळस ___ राव आहेत सर्वांपेक्षा सरस.

 

  • माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची …..रावांचे नाव घेतेय संक्रांतीच्या दिवशी.

 

  • गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी.. …रावांचे नांव घेते, मकर संक्रांतिच्या दिवशी.

 

  • मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधाशी,…….रावांचे नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

 

  • आयुष्याच्या सागरात ( मुलाकडील आडनाव ) ची नौका ___ रावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका.

 

  • तिळाचा स्नेह गुळाची गोडी,सदा सुखात राहो ……. जोडी.

 

  • दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी ___ रावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी.

 

  • वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस ——- रावांच नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस.

 

  • मंगलकार्याची खूण म्हणजे दाराला तारण …..रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण.

 

  • पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया,…..रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया.

 

  • मैत्रिणी सारखी नणंद माझी, भावासारखा आहे दीर ___ रावांचे नाव घ्यायला मन माझे नेहमीच अधीर.

 

  • तिळासोबत गुळाचा गोडवा किती छांन …..रावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण.

 

  • तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खून ___ रावांच नाव घेते ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची सून.

 

  • रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास …..रावांचे नाव घेते संक्रांतीला खास.

 

  • तिळगुळाच्या देवघेवीने दृढ प्रेमाचं जुळतं नात,…..रावंच नाव घेते आज आहे मकरसंक्रांत.

 

  • तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कोणी…….रावांची ……मी राणी

 

 

मराठी उखाणे संक्राती  (marathi ukhane sankranti)(makar sankranti ukhane)

  • हळदी कुंकूवाचे कारण सासू आहे प्रेमळ नणंद आहे हौशी …..रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी.

 

  • आई वडिलांचा निरोप घेताना पाऊले होतात कष्टी ___ रावांच्या आयुष्यात करेन सुखाची वृष्टी.

 

  • नंदन वनात नाग नागिणीची वस्ती ……. राव यांना आयुष्य मागते माझ्या पेक्षा जास्ती

 

  • गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत …..रावांचे नाव घेते संक्रांतच्या पूजेत.

 

  • तिळगुळाच्या संक्रातीला, जमतो स्वादिष्ट मेळा,….रावांचे नाव घ्यायची हीच तर खरी वेळा.

 

  • संक्रातीच्या सणाला आहे सुगड्याचा मान …..रावांच्या नावावर देते हळदी कुंकवाच वान.

 

  • कवीची कविता मनापासून वाचावी ___ रावांच्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी.

 

  • असंख्य तारे नभात पाहावेत निरखून,…..रावां सारखे पती वडिलांनी दिले पारखून.

 

  • हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी …..रावांचे नाव घेते मकर संक्रातीच्या दिवशी.

 

  • संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात ….रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात

 

  • अंगणात काढते रांगोळी फुलांची ___ रावांचे नाव घेते नवी सून ( मुलाकडील आडनाव ) घराण्याची.

 

  • सोसायट्यांच्या वाऱ्याने सगळीकडे उडते धूळ …..रावांचे नाव घेते आणि वाटते तिळगुळ.

 

  • तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान……चे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण

 

  • तीळासारखा स्नेह गुळासारखी गोडी …..रावांच नाव घेते सुखी असावी जोडी.

 

  • तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा……..चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा..

 

 

मकर संक्रांती विशेष उखाणे (ukhane makar sankranti special)

  • आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा ___ रावांच्या पाठीशी ईश्र्वराचा हात सदैव असावा.

 

  • मोत्याची  माळ, सोन्याचा साज …..रावांचे नाव घेते, मकर संक्रातीचा सण आहे आज.

 

  • माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची …….रावांचे नाव घेतेय,संक्रांति च्या दिवशी.

 

  • घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण, …..रावांचे नाव घेते संक्रातीचे कारण.

 

  • घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण ,……रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण

 

  • संसार रुपी सारिपाठावर पडले मनाजोगे दान ___ रावांचे नाव घेऊन राखते तुमचा मान.

 

  • तिळगुळ घ्या गोडगोड बोला ……शी लग्न झाले वर्ष झाले सोळा.

 

  • कपाळाच कुंकू जसा चांदण्याचा ठसा …..रावांचे नाव घेते हळदी कुंकवाला बसा.

 

  • गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशा,_____रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.

 

  • शिवाजी महाराजांसारखे पुत्र धन्य जिजाऊची कुशी ….रावांच नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी.

 

  • नेत्रांच्या निरांजनात अश्रुंच्या वाती ___ रावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती.

 

  • तिळगुळ घ्या आली संक्रांत— माझ्याबरोबर मला कसली भ्रांत.

 

  • महादेवाच्या पिंडीवर गव्हाच्या राशी ….रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

 

  • उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टाकते केळीला …..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळेला

 

  • नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा ….रावांच नाव घेते सन आहे संक्रांतीचा.

 

 

मकर संक्रांतिचे उखाणे (makar sankranti che ukhane)(makar sankranti ukhane)

  • राजहंस पक्षी पाळतात हौशी ….रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

 

  • संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली …..रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली.

 

  • तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवा,रावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा.

 

  • चांदीच्या ताटात रेशमी खण ….रावांच नाव घेते संक्रांतीचा सन.

 

  • जीवनाच्या करंजीत प्रेमासाचे सारण,रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण.

 

  • अबोलीच्या मुग्ध काळ्या सांगून गेल्या मनीचे…..च नाव घेते सानिध्य आहे मकरसंक्रांतीच्या हळदी कुंकवाचे…….???

 

  • हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी ….रावांच नाव घेते संक्रांतीचा दिवशी.

 

  • कोल्हापूरच्या अंबाबाईपुढे हळदी कुंकुवाच्या राशी, रावांच्या नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाच्या दिवशी.

 

  • सासू माझी मायाळू दीर माझा हौशी ….रावांच नाव घेते संक्रातीच्या दिवशी.

 

  • यमुनेच्या पाण्यात ताजमहालाची सावली—- ना जन्म देऊन धन्य झाली माउली.

 

  • माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची …रावांचे नाव घेतेय, संक्रांतिच्या दिवशी.

 

आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे मकर संक्रांतीचे मराठी उखाणे / sankranti che ukhane हे नक्की आवडले असतील. जर तुम्हाला हे आवडले असतील तर तुम्ही हे marathi ukhane sankranti / ukhane makar sankranti special / sankranti ukhane in marathi for female आपल्या मित्राबरोबर पण Share करू शकता. कदाचित त्याला पण अश्याच मराठी उखाण्याची गरज असू शकते.

Leave a Comment

x
error: Content is protected !!