41 Chhatrapati Shivaji Maharaj Marathi Ukhane छत्रपती शिवाजी महाराजांचे उखाणे

chhatrapati shivaji maharaj marathi ukhane हे आपल्या खास बंधू भगिनी साठीच बनविले गेले आहेत. सर्व प्रथम रयतेच्या या राज्याला मानाचा मुजरा. राजाधिराज महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम. या लेखात छत्रपती शिवाजी महाराजांचे उखाणे खास मावळ्यांसाठी बनविले गेले आहेत ते आपण पाहणार आहोत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पराक्रमांच्या गाथा खूप मोठ्या आहेत आपल्या देशासाठी त्यांनी खूप महान कार्य केले आहे. अशा या रयतेच्या राजाच्या कीर्ती व पराक्रमाला अनुसरून हे उखाणे बनविले गेले आहेत हे उखाणे वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वापरू शकता. chhatrapati shivaji maharaj marathi ukhane जर तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्र परिवारासोबत पाठवा तसेच काही चुकीचे आढळ्यास ते हि कळवा धन्यवाद.

chhatrapati-shivaji-maharaj-marathi-ukhane
chhatrapati shivaji maharaj marathi ukhane/marathi ukhane shivaji maharaj

chhatrapati shivaji maharaj marathi ukhane (छत्रपती शिवाजी महाराज उखाणे)

  • छत्रपती शिवाजी महाराज आहेत, स्वराज्याचा हिरा, ……रावांचे नाव घेऊन, उखाणा करते पुरा.

 

  • शिवनेरी किल्यावर झाला, शिवरायांचा जन्म, …….रावांसारखे पती मिळावे, सात जन्म.

 

  • छत्रपती शिवाजी महाराज, आमचे आदर्श आहेत,……राव माझे, सौभाग्य आहेत.

 

  • शिवरायांचे मावळे आम्ही, नाही कुणाची भीती, ……रावांची अन् माझी आहे, सौभाग्याची प्रीती.




 

  • शिवरायांचे मावळे आम्ही, नाही कुणाची भीती, …….रावांची अन् माझी आहे, सौभाग्याची प्रीती.

 

  • शब्द पडतील कमी, एवढी महाराजांची कीर्ती आहे, ………रावांसोबत पतीच्या आधी, एक प्रेमळ मैत्री आहे.

 

  • छत्रपती शिवाजी महाराज आले की, शत्रू जायचे पळून, …….चे नाव घेते, जरा बघा मागे वळून.

 

  • सह्याद्रीच्या छातडातून, नाद भवानी गाजे, ……..रावांचे नाव घेते, छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे

 

  • छत्रपती शिवाजी राजे मिळाले, महाराष्ट्राच्या मातीला,……रावांसारखे प्रेमळ पती मिळाले, आयुष्यभर माझ्या साथीला.

 

  • शिवाजी महाराजांची होती, सिंहाची चाल आणि गरुडाची नजर, ……रावांचे नाव घेण्यास, मी नेहमी हजर.

 

  • रयतेचे राजे होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराज एकच, …..राव समाजासाठी, नेहमी कार्य करतात नेकच.

 

  • शिवरायांनी राज्य केले, शक्तीपेक्षा युक्तीने, …….रावांचे नाव घेते, प्रेमभाव भक्तीने.

 

  • हिंदवी स्वराज्य स्थापन केले, छत्रपती शिवाजी महाराजांनी,….आपण संसाराची सुरवात करू, सर्वांच्या आशीर्वादांनी.

 

  • शिवाजी महाराज आहेत, अखंड भारताची शान, …….रावांचे नाव घेते, ठेवून सर्वांचा मान

 

  • छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराष्ट्राच्या पाठीचा कणा, …..चे नाव घेते, सर्वानी जय महाराष्ट्र म्हणा

 

  • धन्य जिजाऊ माउली, ज्या बनल्या शिवबांच्या गुरु, ……रावांचे नाव घेऊन, उखाणा करते सुरु.




 

  • रायगडावर केले तयार शिवाजीने राष्ट्र …..रावांच नाव घेऊन मी म्हणते जय महाराष्ट्र

 

  • शिवाजी राजांनी किल्ला जिंकला शक्ति पेक्षा युक्तिने, ……रावांच नाव घेते प्रेमभाव भक्तिने

 

  • शिवाजीने केली औरंगझेबावर मात…….रावांच नाव घेते मी माझ्या आजोबांची नात

 

  • घोडयांवरती बसले शिवाजी राजा ……रावांच नाव घ्यायला मला येते मजा

 

  • तानाजीने दिली शिवाजीला स्वराज्याच्या लढाईत साथ नाव घेऊन …….रावांचे मी देते ह्यांच्या सुख दुःखात साथ

 

  • मिठीत जाता शिवरायाने चिरले पोट अफझल खानाचे, मिठीत जाता …….रावांच्या शिरले हृदयात चित्र माझे

 

  • स्वामी रामदास ने दिला उपदेश शिवाजी राजाला नाव घेऊन ….रावांचे नमस्कार करते पंढरपूरच्या विठोबाला

 

  • रायगडावर केले तयार शिवाजीने राष्ट्र …..रावांच नाव घेऊन मी म्हणते जय महाराष्ट्र

 

  • शिवरायांचे मावळे आम्ही भगव आमच रक्त…..राणीच नाव घेतो मी शिवरायांचा भक्त

 

  • आहे डोळ्यापुढे जिजाऊंचा आदर्श …….रावांच्या मुलाच्या बारशाला मनी दाटे हर्ष

 

  • शिवरायांचे स्वराज्य, जिजाऊंचे स्वप्न संभाजींचा पराकम, पेशव्यांची जिद्द सावित्रीचा निर्धार, महात्मा फुलेंचा आधार टिळकांची बंडखोरी, गांधी मवाळ अभिमान वाटतो यांच्या शौर्यगाथा ऐकूण …….रावांच नाव घेते सर्व महात्म्यांना नमन करुन

 

  • पराक्रमाची साक्ष देते मर्द मराठ्यांची तलवार …..राणीच नाव घेतो करुन शिवरायांना नमस्कार

 

  • शिवरायांच्या माथ्यावर माता भवानीचा हाथ ……राव आणि माझी सात जन्मांची साथ

 

  • शिवरायांचे स्वराज्य संभाजीची दूरदृष्टी …….रावांच्या/राणीच्या आगमनाने सुंदर वाटे ही सृष्टी

 

  • वडाला घालते प्रदक्षिणा, तुळशीला घालते पाणी, मारुतीला करते नवस….रावांच नाव घेते आज आनंदाचा दिवस

 

  • शिवाजी महाराजांनी किल्ले जिंकले शक्ति पेक्षा युक्ति ने … रावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने

 

  • डौलात फडकणाच्या भगव्याला करते मानाचा मुजरा ……..रावांच्या नावाने करते मकरसंक्रांतीचा सण साजरा

 

  • हिंदवी स्वराज्यासाठी लढला शूर आबांचा शूर छावा …. रावांचं नाव घेते अखंड सौभाग्याचा आशीर्वाद द्यावा

 

  • साडेतीनशे वर्षांनंतरही जिवंत आहे शिवशंभूच्या पराक्रमाचा ईतिहास…. रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास




 

  • शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी 32 मण सोन्याचे सिंहासन घडवले….रावांचं नाव घेण्यासाठी सगळ्यांनीच अडवले

 

  • किल्ले रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी ….राव आहेत माझ्या कुंकवाचे धनी

 

  • जेजुरीचा खंडेराया तुळजापूरची आदिशक्ती … रावां सोबत करीन मी शिवरायांची भक्ती

 

  • हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात सर्वश्रेष्ठ रायगडाचे स्थान…. रावां मुळेच मिळतो मला हळदी कुंकवाचा मान

 

  • राजधानी रायगडाचे प्राचीन नाव म्हणजे रायरी ………रावांसोबत चढते मी मंदिराची पायरी

 

  • छत्रपती शिवाजी महाराजांनी जिजाऊ माँसाहेबांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न साकार केलं ….रावांनी मला सौभाग्याचं लेणं दिलं

 

आम्हाला खात्री आहे कि आपल्याला हे छत्रपती शिवाजी महाराजांचे उखाणे / shivaji maharaj marathi ukhane हे नक्की आवडले असतील. जर तुम्हाला हे आवडले असतील तर तुम्ही हे marathi ukhane shivaji maharaj ukhane marathi shivaji maharaj / chhatrapati shivaji maharaj marathi ukhane / marathi ukhane navardevasathi shivaji maharaj आपल्या मित्राबरोबर पण Share करू शकता. कदाचित त्याला पण अश्याच मराठी उखाण्याची गरज असू शकते.

Leave a Comment

x
error: Content is protected !!